
निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम
अकोला, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर कार्यवाही पूर्ण होण्यासाठी पुरेसा अवधी मिळण्यासाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. तसा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, प्राप्त अर्जांनुसार प्रारूप मतदारयाद्या तयार करणे, छपाई आदी कार्यवाही दि. 28 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. प्रारूप मतदारयाद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक 3 डिसेंबर (बुधवार) असा करण्यात आला आहे. दि. 3 ते 18 डिसेंबर दरम्यान दावे, हरकती स्वीकारण्याचा कालावधी असेल. मतदारयादीच्या अंतिम प्रसिद्धीचा दिनांक 12 जानेवारी (सोमवार) असा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे