विद्यार्थी, महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्याचे आवाहन
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणा-या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्व
विद्यार्थी, महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्याचे आवाहन


परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणा-या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन 2024-25 व त्यापुर्वीच्या सर्व वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांना दि. 30 नोव्हेंबर, 2025 पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. सदर अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्जासाठी केंद्र हिस्सा कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही. त्यामुळे, सर्व प्रलंबित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एच.एडके यांनी केले आहे.

महाविद्यालयांनी आवश्यक व तातडीची कार्यवाही पुढीलप्रमाणे करावी.

विद्यार्थी स्तरावर प्रलंबित अर्ज : ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे परत पाठवले गेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तातडीने संपर्क साधून, त्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज 2 (दोन) दिवसांत प्राप्त करून घेऊन मंजुरीची कार्यवाही करण्याच्या व विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आपण लाभापासून वंचित राहाल व याची जबाबदारी आपली राहील अशा स्पष्ट सूचना द्याव्यात.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज : महाविद्यालय लॉगिनमध्ये पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जावर कोणतीही दिरंगाई न करता महाविद्यालयाने तात्काळ तपासणी करून परिपूर्ण अर्जावर मंजूरीची कार्यवाही पूर्ण करावी.

वितरणासाठी प्रलंबित अर्ज: ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही आणि आधार-बॅंक सीडिंगमध्ये अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवावी. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांकडून त्यांचे आधार बँक खाते एनपीसीआय प्रणालीद्वारे https://www.npci.org.in/ पोर्टलवरील भारत आधार सिडींग इनाब्लेर प्रणालीद्वारे संलग्न करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी.

आधार-बँक संलग्नता यशस्वी झाल्याची खातरजमा झाल्यानंतर, महाविद्यालय लॉगिनमधील Payment Failed Utility या पर्यायामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील योग्य पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करुन घ्यावी. सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन सन 2019-20 ते 2024-25 या कालावधीत महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहनही श्री. एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande