बिहारमधील विजयानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजनाच्या उपस्थितीत जल्लोष
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि घवघवीत विजयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे आज मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या ग
बिहार विधानसभा निवडणुकीत  मिळालेल्या  विजयाचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनाच्या उपस्थितीत  भाजपाचा जल्लोष


नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि घवघवीत विजयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे आज मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या गजराने, फटाक्यांच्या आतषबाजीने आणि ‘भाजपा जिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उसळलेल्या उत्साहाला आणखी उधाण आले.विजयाच्या निमित्ताने मिठाई वाटप, पताका फडकवणे आणि अभिनंदनाच्या घोषणा उत्साहात पार पडल्या. बिहारच्या जनतेने विकास, स्थिरता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.

गिरीश महाजन यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, “बिहारचा हा विजय म्हणजे विकासाच्या राजकारणाचा विजय. मोदीजींच्या नेतृत्वावरचा देशव्यापी विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.नाशिक महानगर भाजपने केलेल्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम जल्लोषमय आणि भव्यतेत पार पडला.यावेळी भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष श्री. सुनील केदार, आमदार सौ. देवयानी ताई फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सरचिटणीस सुनील देशाई, तसेच महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती भाम्रे, यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande