‘अमृत दुर्गोत्सव' ची विश्वविक्रमाला गवसणी !
चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविक्रमी झेप घेतली आहे. अमृत'' मार्फत या दिवाळीत अमृत दुर्गोत्सव 2025'' हा एक आगळावेगळा उपक्
‘अमृत दुर्गोत्सव' ची विश्वविक्रमाला गवसणी !


चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविक्रमी झेप घेतली आहे. अमृत' मार्फत या दिवाळीत अमृत दुर्गोत्सव 2025' हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, संस्कृती रक्षण, स्वभाषा, स्वधर्म यासारख्या अनेक गुणांना उजाळा देऊन अनेकांच्या मनावर सुसंस्कार करणे, या दृष्टीने समाजमन घडविणे आणि शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. यासाठी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेले आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या 12 दुर्गापैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटी, शाळेत, मैदानात तयार करून त्यासोबत फोटो घेऊन तो ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ च्या वेबसाईटवर अपलोड करायचा होता. सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र मिळणार होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, शेजारील राज्ये, इतकेच काय अमेरिका. इंग्लंड, आखाती देशातून मिळालेला प्रतिसाद याद्वारे अमृत दुर्गोत्सवात प्रचंड प्रमाणात दुर्गांसोबत घेतलेले फोटो जमा झाले. ही संख्या इतकी प्रचंड होती की, या गोष्टीची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' या विश्वविक्रमांची नोंदणी करणाऱ्या जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेने घेतली.मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीमध्ये अमृत दुर्गोत्सवात विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' चे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द केले.

यावेळी पंच प्रवीण पटेल यांनी सदर विश्वविक्रमाची कठीण तपासणी प्रक्रिया सर्वांपुढे मांडली. सुयोग्य चित्रे निवडणे, अस्पष्ट व दुबार चित्रांना बाद करणे आदी अनेक दिवस चाललेल्या अतिशय क्लिष्ट प्रक्रियेतून जाऊन विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून अमृत मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे अधिकृत प्रमाणपत्र विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले. या विश्वविक्रमात सहकार्य करणारे सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक नेतृत्व, दुर्गप्रमी, विद्यार्थी, सर्व शिवप्रेमी, अमृत कर्मचारी यांचे जोशी यांनी आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande