चंद्रपूर वन अकादमीला ग्रिहा कौन्सिलकडून थ्री स्टार सन्मान
चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रपूर वन अकादमीला GRIHA कौन्सिल, टेरी (TERI), नवी दिल्ली यांच्याकडून थ्री स्टार मानांकन प्रदान करण्यात आले आहे. अकादमीने गेल्या काही
चंद्रपूर वन अकादमीला ग्रिहा कौन्सिलकडून थ्री स्टार सन्मान


चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रपूर वन अकादमीला GRIHA कौन्सिल, टेरी (TERI), नवी दिल्ली यांच्याकडून थ्री स्टार मानांकन प्रदान करण्यात आले आहे. अकादमीने गेल्या काही वर्षापासून राबविलेल्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर आधारित उपाययोजनांमुळे पुढीलप्रमाणे बचत साध्य झाली आहे. यात वीज बचत 4597 मेगावॅट प्रति तास प्रति वर्ष, हरितगृह वायू उत्सर्जन घट 3769 मेट्रिक टन, कार्बन डॉयऑक्साईड समतुल्य प्रति वर्ष, पाणी बचत 199110 किलोलीटर प्रति वर्ष.

देशातील एकमेव वन प्रशिक्षण संस्था तसेच महाराष्ट्रातील एकमेव शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून या सन्मानाने चंद्रपूर वन अकादमीने इतिहास रचला आहे. हा सन्मान महाराष्ट्र वन विभागाच्या मुकुटातील आणखी एक मानाचा तुरा ठरला असून राज्यातील पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.

या यशाचे श्रेय वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा व इतर अधिकारी कर्मचारी यांना दिले जाते. संचालक रेड्डी त्यांच्या दूरदृष्टी, पर्यावरणाबद्दलची संवेदनशील दृष्टी व अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाल्याचे अपर संचालक उमेश वर्मा यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande