दोंडाईचा येथे नगराध्यक्ष पदासाठी पालकमंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्रींची उमेदवारी दाखल
धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांचा उमेदवारी अर्ज आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करीत जल
दोंडाईचा येथे नगराध्यक्ष पदासाठी पालकमंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्रींची उमेदवारी दाखल


धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांचा उमेदवारी अर्ज आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करीत जल्लोषात मिरवणुक काढून दाखल करण्यात आला. यासाठी आज सकाळी अकराला दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीत त्यांच्या मातोश्री तथा माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी आज लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आज आपले नामांकन पत्र दाखल केले. यासाठी आज सकाळी ११ वाजेला दोंडाईचा शहरातून भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. येथील रावल गढीजवळील शिवमंदिरापासून मिरवणूक सुरू झाली. ही रॅली माता भगवती मंदिर, आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौक, गणपती मंदिर, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शहीद अब्दुल हमीद चौकमार्गे राजपथ आणि श्रीराम मंदिर मार्गाने जावून नगरपरिषदेजवळ समारोप करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, सरकारसाहेब रावल, आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande