
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) - राजापूर येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हेमंत अकोलकर यांना शिक्षण संशोधन व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी मराठी साहित्य मंडळाकडून राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहिल्यानगर येथे झालेल्या सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ. अकोलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. अकोलकर गेल्या १५ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवरील ६७ संशोधनपर लेख, ११ आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि सहा पेटंट प्रकाशित झाले आहेत. सरोज पाटील, संगीता पाटील, प्रशांत पाटील, विक्रांत पाटील, सतीश रेडीज, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, डॉ. संजय मेस्त्री आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी