

नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आता नाशिक शहरात देखील धुमाकूळ घातला आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका कामगार वस्ती वरती हल्ला करून एकाला जखमी केल्याची घटना घडली. तर बिबट्याला काबूत आणण्यासाठी प्रयत्न करणारा एक वनाधिकारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे . धुमाकूळ घालण्याला बिबट्याला अखेर बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा हौदस सुरू आहे . नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी ,नाशिक, निफाड येवला या भागामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे.
जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आता नाशिक शहराचेही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी नाशिक शहरातील भोसला मिलिटरी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या कामगार वस्तीमध्ये काम करत असलेल्या एका कामगारावरती बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये हा कामगार जखमी झाला त्यानंतर हा बिबट्या शेजारील एका बंगल्यामध्ये गेला ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी तपास करत असलेल्या अधिकाऱ्यावरती लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले या दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली जखमींची विचारपूस केली त्यांच्याकडून माहिती घेऊन वनविभागाचे अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV