माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा भाजपात प्रवेश
धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) दोंडाईचा शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या गटाने आज भारतीय जनता पक्षाला आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील विकासकारभाराला जाहीर पाठिंबा घोषित
भाजप लोगो


धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) दोंडाईचा शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या गटाने आज भारतीय जनता पक्षाला आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील विकासकारभाराला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. अनेक वर्षे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दोन गटांमधील एकत्र येण्याच्या निर्णयामुळे दोंडाईच्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. देशमुख गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष आणि डॉ. हेमंत देशमुख यांचे बंधू डॉ.रविंद्र देशमुख यांनी स्वत मंत्री रावल यांच्या जनदरबार कार्यालयात उपस्थित राहून भाजपाला हा पाठिंबा जाहीर केला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ.नयनकुंवरताई रावल यांना देखील या गटाचा अधिकृत पाठिंबा घोषित करण्यात आला. सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर राजकीय मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी पालकमंत्री जयकुमार रावल, सरकारसाहेब रावल उद्योजक समूहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी महापौर प्रदिप कर्पे, चंद्रकांत सोनार, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह दोंडाईचा पालिका पदाधिकारी आणि भाजपचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ घालून मंत्री रावल यांनी डॉ. रविंद्र देशमुख आणि अमित पाटील यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.

सोबत माजी बांधकाम व पाणीपुरवठा सभापती भूपेंद्र धनगर, माजी बांधकाम सभापती महेंद्र पाटील, माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या, सुरेश कुंवर, नितीन देसले, कैलास वाडीले, मोहसिन शेख, आबिद शेख, मनोज महाजन, राहुल आव्हाड, देवेंद्र चौधरी, रामचंद्र पाटील, दिपक कोलाटी, शरद कागणे, पिरण सुतारे, जितेंद्र तिरमले, मदन केशे, ड. रविंद्र मोरे, दिनेश चोळके, संजय नगराळे, संजय गारुंगे, जितेंद्र चव्हाण, प्रा. योगेश केशे, जगन चव्हाण, पंकज चोळके, संजय पाटील, नारायण भिलाणे, लक्ष्मण वेडू माळी, संजय पंडित पाटील, छोटूलाल पाटील, नवनित पाटील, सुमित गरूड, दिलीप नगराळे, कालू नगराळे, राजेश गारूंगे, सावंत गारूंगे, अशोक खंडू सावंत, महेंद्र मिस्तरी, प्रकाश माळके, प्रतीक माळके, संदीप पाटील, नितीन पाटील, शेखर विश्राम बोरसे, विजय सैदाणे, हेमंत देवरे, सागर चव्हाण, अनिल पेंढारकर, भटू मालचे, छबीलाल भामरे, सुधाकर पाटील, भूषण माळी, प्रविण भदाणे, नरेंद्र धनगर, आबा महाजन, दिपक कुकरेजा आदींसहशेकडो कार्यकत्यारनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख म्हणाले की, दोंडाईचा शहरासह संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघात मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू झाली आहे. या विकास प्रवाहाला चालना मिळावी म्हणून माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी मंत्री रावल यांना पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोंडाईचा शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्ये केला. चाळीस वषारची राजकीय कटुता दूर होणे ही अनेकांची अपेक्षा होती आणि आज ती पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात आमदार राम भदाणे, सरकारसाहेब रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील तसेच मंत्री जयकुमार रावल यांनीही मनोगत व्ये करत डॉ. देशमुख गटाच्या निर्णयाचे स्वागत केले. दोंडाईचा नगरपालिकेच्या निवडणुकीत हा निर्णय मोठा राजकीय टनिरग पॉइरट मानला जात असून मंत्री जयकुमार रावल यांच्यागतासाठी आगामी निवडणूक जिंकणे सोपे झाले असे म्हटले जाते आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande