बिहारमधील एनडीएचा विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण - खा. अशोक चव्हाण
नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएचा विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण विजय आहे. एनडीएला मोठे बहुमत मिळाले असून, महागठबंधनची अवस्था दयनीय झाली आहे.या शब्दात भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली पंत
बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएचा विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण विजय


नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएचा विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण विजय आहे. एनडीएला मोठे बहुमत मिळाले असून, महागठबंधनची अवस्था दयनीय झाली आहे.या शब्दात भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची उत्तम प्रतिमा आणि भाजप-जेडीयू सरकारच्या माध्यमातून बिहारमध्ये झालेला विकास याचा परिपाक म्हणजे हा विजय आहे. या विजयासाठी मी या तीनही नेत्यांचे आणि बिहारमधील सर्व कार्यकर्त्यांचे व मतदारांचे अभिनंदन करतो. भाजपवर बिनबुडाचे आरोप करायचे, मतचोरीचा ठपका ठेवायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार जनतेने नाकारला आहे. बिहारचा निवडणूक निकाल हा लोकशाहीचा विजय आहे.

नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुद्धा भाजप युतीचा विजय निश्चित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande