
धुळे, 14 नोव्हेंबर (हिं.स.) पत्रकार, पत्रकारेतर कर्मचार्यांना वेतन आयोग नाही. तसेच पत्रकारांची सरकारकडे नोंदणी देखील नाही. खर्या पत्रकारांना हक्कआणि अधिकार मिळायचे असतील तर पत्रकार नोंदणी, अर्थात गणना व्हायला हवीच, यात जो नोंद क्रमांक मिळेल तोच माध्यमकर्मीच्या कामाचे रेकॉर्ड अपडेट करणारा, असेल. आर्थिक, सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे, असे शीतल हरीष करदेकर (मुंबई), राष्ट्रीय अध्यक्ष - मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाफ तर्फे माध्यमकर्मींचे हक्क आणि अधिकारफ या विषयावर आयोजित परिसंवादात सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माई संघटनेचे उपाध्यक्ष तथा संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार अब्दुल कदीर, माईचे मुंबई जिल्हाध्यक्ष चेतन काशीकर यांच्यासह पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील मंचावर उपस्थित होते. परिसंवादात शीतल करदेकर यांनी विषयाची मांडणी करताना सांगितले की, पत्रकारांना वेतन आयोग नाही. आपण आपले हक्क मालकांकडे मागत असतो. सरकारकडे पत्रकारांची नोंदणी देखील नाही. आपली सरकारने नोंदणी केली पाहिजे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या हितासाठी पत्रकार महामंडळ स्थापन झाले पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत. मी यासाठी आमरण उपोषण देखील केले आहे. महामंडळ स्थापन झाल्यास पत्रकारांच्या अनेक समस्या सुटणार आहे. खर्या पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर