
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील वांगी रोड परिसरात निसार किराणा दुकानासमोर नाला नसल्याने नेहमीच रस्त्यावर पाणी साचत असे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना घाण पाण्यातून वाट काढावी लागत होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या समस्येमुळे स्थानिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
ही परिस्थिती लक्षात घेत शेख निसार अन्सर पिंजारी यांनी पुढाकार घेत रस्त्यावर नाली खोदून पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेतले. नाली बांधकाम आणि रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने परिसरातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांतर्फे शेख निसार अन्सर पिंजारी यांचे कौतुक करण्यात येत असून स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी सय्यद ईसा, शेख सोहेल पिंजारी, सय्यद असेफ, निसर खान, शेख रहमत, शेख अण्णा, शेख इमरान, नियाजुद्दीन यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis