
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे ९ उमेदवार आज जाहीर झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी अंतिम करण्यात आली, असे रत्नागिरी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमदार किरण सामंत, यशवंत जाधव, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विलास चाळके आणि बंड्या साळवी यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली.
शिवसेनेचे अधिकृत ९ उमेदवार (प्रभागानुसार) असे : प्रभाग २ — निमेश नायर, प्रभाग ३ — राजन शेट्ये, प्रभाग ५ — सौरभ मलुष्टे, प्रभाग ७ — गणेश भारती, प्रभाग ७ — श्रद्धा हळदणकर, प्रभाग ८ — बाळू साळवी, प्रभाग ९ — विजय खेडेकर, प्रभाग १३ — सुहेल साखरकर, प्रभाग १३ — आफरीन होडेकर
शिवसेनेचे ९ आणि भाजपचे ६, असे एकूण १५ महायुतीचे उमेदवार उद्या, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज सादरीकरणापूर्वी महायुतीची शक्तिप्रदर्शन मिरवणूक काढण्यात येणार असून पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी