
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।सह्याद्री फाउंडेशन परभणी आयोजित व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट यांच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी हा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक आनंद शिंदे यांच्या बहारदार भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमाचेही विशेष आयोजन करण्यात आले असून नागरिकांत उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमासाठी निर्धारित स्थळाचे भूमिपूजन आज 14 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रम आयोजक सुधीर साळवे, कैलास पवार पाटील, ॲड. मोती शिंदे, ॲड. पवन जोंधळे, आकाश राजे सुरवसे, राहुल घनसावंत, इंजि. विश्वजीत गायकवाड, अमोल बेंद्रे, प्रभाकर कदम, गजानन कचवे, अविनाश हातागळे, नरेश खैराजानी, डी. एस. सरकार, पांडुरंग डुकरे, मनोज साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक व सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने सर्व परभणीकरांना आवाहन करण्यात आले असून, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis