
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्टतर्फे देशपिता, क्रांतिवीर आणि सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन परभणी शहरातील वसमत रोडवरील लहुजी वस्ताद साळवे कॉर्नर, सुयश कॉलनी, कृषी विद्यापीठ रोड येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पी. जी. रणबावळे यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत वाघीकर, समाजसेवक आकाश साळवे, डॉ. सुनील जाधव, हेमंत साळवे (सामाजिक कार्यकर्ते), मोहन रणबावळे, अशोक पवार, युवा नेते कुणाल गायकवाड, इरफान भेया, विलास रणबावळे, बालाजी कुलकर्णी आणि श्याम रणबावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी साळवे यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या समाजकारणातील योगदानावर प्रकाश टाकत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील रणबावळे, राजू मकासरे, गजानन रणबावळे, बाळासाहेब कुलकर्णी, राजेश नागूला, संतोष लोखंडे, तात्यासाहेब नाईकनवरे आणि सुरेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रणबावळे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तराव सोनवणे यांनी केले तर आभारप्रदर्शन ट्रस्टचे संचालक सुनील ससाणे यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis