बिहारमध्ये एनडीएचा विजय ऐतिहासिक - अजित पवार
मुंबई , 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढविश्वासाचे त
बिहारमध्ये एनडीएचा विजय ऐतिहासिक - अजित पवार


मुंबई , 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढविश्वासाचे ते प्रतिक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. तेथील लाडक्या बहिणींचेसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशिर्वाद लाभले. त्याचेच हे यश आहे. बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

हा विजय केवळ संख्याबळाचा नसून विकास, सुशासन आणि सामाजिक न्याय धोरणाचा विजय आहे...एनडीएच्या एकजुटीचा विजय आहे.त्यामुळे बिहारच्या सर्वांगिण विकासाला आणखी गती देईल आणि राज्याला नवी दिशा मिळेल.पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात बिहार आणखी झपाट्याने पुढे जाईल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande