
रत्नागिरी, 16 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत आज भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले. शिवसेनेच्या नऊ आणि भाजपाच्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
शिवसेनेतर्फे निमेश नायर, राजन शेट्ये, सौरभ मलुष्टे, गणेश भारती, श्रद्धा हळदणकर, बाळू साळवी, विजय खेडेकर, सुहेल साखरकर आणि आफरीन होडेकर यांनी अर्ज भरले. भाजपाकडून राजू तोडणकर, मानसी करमरकर, समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे, नितीन जाधव यांनी अर्ज दाखल केले.
महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार १७ तारखेला अर्ज भरेल व १५ हजार मतांनी आमचा उमेदवार विजयी होणार, असा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार किरण सामंत, अतुल काळसेकर, भाजपा निवडणूक जिल्हा प्रभारी ॲड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे देवेंद्र वणजु, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन, निवडणूक प्रमुख सचिन वहाळकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार यशवंत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी