मतमोजणीसाठी चिपळूणमध्ये वाहतुकीत बदल
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चिपळूणमध्ये चिंचनाका ते
मतमोजणीसाठी चिपळूणमध्ये वाहतुकीत बदल


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चिपळूणमध्ये चिंचनाका ते बहादूरशेख नाका व बहादूरशेख नाका ते चिंचनाका या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात ठेवण्यात येणार आहे, तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले.

या मार्गावरील वाहनांना मुंबई व कराडकडून चिपळूण शहरात येणारी जड वाहने, एसटी बससह इतर सर्व वाहने बहादूरशेख नाका मुंबई गोवा हायवे, डीबीजे कॉलेज, शिवाजी नगर बसस्थानक, पॉवर हाऊस सर्कल मार्गे एस.टी. बसस्थानक व चिपळूण शहरामध्ये जाण्याचा मार्ग आहे. चिपळूण शहर व बसस्थानकातून पोलीस ठाणे-पॉवर हाऊस मार्गे मुंबईकडे व रत्नागिरीकडे जाता येणार आहे.

विधानसभा निवडणुकीची युनायटेड हायस्कूल चिपळूण येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शेखर निकम यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांचे समर्थक तसेच दोन्ही पक्षाकडील बहुसंख्य समर्थक मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी युनायटेड हायस्कूल चिंचनाका ते बहादूरशेख नाका जाणारे रोडवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी, याकरिता हा बदल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande