रत्नागिरी जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान
रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६० टक्क्यांचा आकडा गाठला आहे. जिल्ह्यात सकाली ७ ते सायंकाळी ५ या वेळेत सरासरी ६०.३५ टक्के मतदा
विधानसभा निवडणूक


रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६० टक्क्यांचा आकडा गाठला आहे.

जिल्ह्यात सकाली ७ ते सायंकाळी ५ या वेळेत सरासरी ६०.३५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटनांचीही नोंदही झाली नाही. सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याने मतदानाची सायंकाळी ६ ची वेळ संपली, तरी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्या संपायला किमान एक ते दीड तास लागेल, असा अंदाज होता.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात मतदारसंघनिहाय झालेले मतदान असे –

१) दापोली - ५९.२%

२) गुहागर - ५९.०५%

३) चिपळूण- ६३.५१%

४) रत्नागिरी - ५९%

५) राजापूर- ६१.०५%

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande