लग्नाच्या वाढदिवशीच राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या घरी चिमुकलीचे आगमन
मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलीवूडमधील सर्वात चर्चित आणि आवडत्या जोड्यांपैकी एक असलेल्या राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या आयुष्यात आनंदाचा द्विगुणित क्षण आला आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे आणि याच विशेष दिवशी त्यां
लग्नाच्या वाढदिवशीच राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या घरी चिमुकलीचे आगमन


मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलीवूडमधील सर्वात चर्चित आणि आवडत्या जोड्यांपैकी एक असलेल्या राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या आयुष्यात आनंदाचा द्विगुणित क्षण आला आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे आणि याच विशेष दिवशी त्यांच्या घरी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले. या आनंदवार्तेने दोघांच्या कुटुंबातच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पत्रलेखाने कन्येला जन्म दिल्याची माहिती दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वतः शेअर केली.

वाढदिवशी मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट

राजकुमार आणि पत्रलेखाने सकाळीच त्यांच्या चाहत्यांना ही माहिती देत आनंद व्यक्त केला की त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस सर्वात खास ठरला आहे. कारण याच दिवशी त्यांना कन्यारत्नाचा आशीर्वाद लाभला. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिले आहे:

“आम्ही सातव्या आसमानी आहोत. देवाने आम्हाला मुलीच्या रूपाने सर्वात मोठं वरदान दिलं आहे.”

याच वर्षी जुलै महिन्यात राजकुमार राव यांनी पत्नीच्या गर्भधारणेची बातमी सोशल मीडियावर दिली होती.

अभिनयातून जवळ आलेली जोडी

राजकुमार राव आणि पत्रलेखाचे लग्न १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडले होते. विशेष म्हणजे, पत्रलेखाने राजकुमारला पहिल्यांदा लव्ह सेक्स और धोखा या चित्रपटात पाहिले होते, तर राजकुमारने तिला एका जाहिरातीत पाहिले होते.

राजकुमार पहिल्या नजरेतच पत्रलेखावर फिदा झाले होते; मात्र प्रारंभी पत्रलेखाला राजकुमार फारसे आवडले नव्हते. पण २०१४ मध्ये ‘सिटीलाइट्स’ चित्रपटादरम्यान दोघे एकत्र काम करत असताना त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या सुंदर प्रेमकथेला सुरुवात झाली.

या खास दिवशी मुलगी जन्माला आल्याने ही जोडी आता आनंदाने न्हाऊन निघाली आहे. चाहत्यांनीही त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande