‘डायनिंग विथ द कपूर्स’चा ट्रेलर प्रदर्शित
कपूर घराण्यातील अनोखे क्षण प्रथमच प्रेक्षकांसमोर मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि दिग्गज घराण्यांपैकी एक असलेले कपूर कुटुंब आता त्यांच्या आयुष्यातील अनोखे, अनदेखे आणि भावनिक क्षण उलगडत प्रेक्षकांना एका नव्या प्रवासा
कपूर घराण्यातील अनोखे क्षण प्रथमच प्रेक्षकांसमोर


कपूर घराण्यातील अनोखे क्षण प्रथमच प्रेक्षकांसमोर

मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि दिग्गज घराण्यांपैकी एक असलेले कपूर कुटुंब आता त्यांच्या आयुष्यातील अनोखे, अनदेखे आणि भावनिक क्षण उलगडत प्रेक्षकांना एका नव्या प्रवासावर घेऊन जात आहे. ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या खास डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

पहिल्यांदाच एकाच फ्रेममध्ये संपूर्ण कपूर परिवार

ट्रेलरमध्ये कपूर कुटुंबाचा तो उबदार आणि हसतमुख अंदाज दिसतो, जो फार कमी वेळा कॅमेऱ्यात टिपला जातो. हसण्या-खिदळण्याचे क्षण, मजेशीर नोकझोक, जुन्या आठवणींची मैफल आणि अर्थातच स्वादिष्ट अन्न या सगळ्यांनी ट्रेलर रंगतदार झाला आहे.

रणबीर कपूर कधी किचनमध्ये नवे प्रयोग करताना तर कधी भावंडांची मजेत खोड काढत वातावरण हलकं करताना दिसतो. करिश्मा आणि करीना कपूर आपल्या खास अंदाजात कुटुंबाच्या आठवणी शेअर करताना दिसतात.

करीना–सैफची जोडी ठरली ट्रेलरची हायलाइट

ट्रेलरमधील एक विशेष क्षण म्हणजे करीनाच्या प्रेमाचा विषय निघताच संपूर्ण परिवाराचे चेहेरे आनंदाने खुलतात. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि इतर सदस्य राज कपूर यांच्या १००व्या जयंतीच्या आठवणींनी भावूक झाल्याचंही दिसतं.

कपूर कुटुंबाची उबदार मैत्री, आपुलकी आणि अविस्मरणीय एकोप्यामुळे हा ट्रेलर विशेष ठरतो. करीनासोबत तिचा नवरा आणि कपूर घराण्याचा जावई सैफ अली खान याच्या उपस्थितीने ट्रेलरला ग्लॅमर आणि भावनांचा सुंदर तडका मिळाला आहे.

ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांना कपूर कुटुंबाच्या परंपरा, नाती आणि अनोख्या बंधांची एक खास झलक देणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande