अभिनेते दिलीप गुजर यांना कला परिवारचा जीवन गौरव पुरस्कार
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। कला परिवार हडपसरच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हडपसर पंचक्रोशीतील कलाकारांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार सिने नाट्य अभिनेते दिलीप गुजर यांना प्रदान करण्यात आला. तसेच होम
अभिनेते


पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। कला परिवार हडपसरच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हडपसर पंचक्रोशीतील कलाकारांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार सिने नाट्य अभिनेते दिलीप गुजर यांना प्रदान करण्यात आला. तसेच होम मिनिस्टर फेम किरण पाटील यांना गणेश कदम स्मृती पुरस्कार व जगदीश चव्हाण यांना हसीना मंडल स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कला परिवारचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोरे यांनी प्रास्ताविक करून संस्थेचे कार्य विषद केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रकाश सुतार, दत्तात्रय ननवरे, संजय ओसवाल, गणेश फुलारे, सागर मोडक, सुहास पाटील, शरद साळुंखे, बाळासाहेब केमकर व कृष्णकांत कोबल यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे, माजी नगरसेवक योगेशबापू ससाणे, दत्ता दळवी, अशोक जाधव व महेश ससाणे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पुरस्कार वितरणाआधी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर डीव्हाईन ग्रुपने गणेश वंदना सादर केली. तसेच सावली ग्रुप, एसडीएस ग्रुप , के पी ग्रुप या सर्वांनी लेझीम, गवळण व विविध प्रकारची समूह नृत्ये सादर केली. सर्वात शेवटी अघोरी नृत्याने सर्वांचे डोळे दिपवून टाकले.कला परिवाराचे संजीव रासकर व माधुरी रासकर यांना बेस्ट कपल म्हणून गौरवण्यात आले. संजीव रासकर व चेतना जाठवडेकर यांच्या सुंदर रांगोळ्यांनी सर्वांचे मन मोहित झाले.

कार्यक्रमास संजय शिंदे, चांद शेख ,जान मोहम्मद शेख, शैलेश तुरवणकर, स्मिता गायकवाड , शितल शिंदे, नलिनी मोरे या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande