
छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर येथील
भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ १६ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनत पक्षाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत
छत्रपती संभाजी नगर येथे होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्ताने मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार अनुराधा चव्हाण यांनी
या ठिकाणी पाहणी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण होत आली आहे..
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे खासदार डॉ.भागवत कराड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..
सर्वांनी मिळून अंतिम तयारींचा आढावा घेतला आणि कार्यक्रम सुरळीत व भव्यतेने पार पडावा यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis