

मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील वाढत्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असून हेल्मेट न लावणे आणि वरच्या अवयवांवरील गंभीर दुखापतीमुळे मृत्यूची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर इंडो-फ्रेंच संयुक्त उपक्रम निओकवचने भारतातील पहिले ‘इंटेलिजेंट वेअरेबल एअरबॅग सिस्टीम’ असलेले NeoKavach Air Vest जॅकेट बाजारात आणले आहे.
कारमधील एअरबॅगप्रमाणेच दुचाकीस्वारांचे प्राण वाचवण्यास सक्षम असलेली ही वेअरेबल एअरबॅग एखाद्या अपघाताच्या किंवा अचानक पडण्याच्या क्षणी १०० मिलीसेकंदांपेक्षा कमी वेळात कार्यान्वित होते, असा कंपनीचा दावा आहे. या जॅकेटमुळे रायडरची छाती, पाठीचा कणा आणि मान या महत्वाच्या भागांचे संरक्षण होते, जे अपघातातील मृत्यूंपैकी तब्बल ७० टक्के मृत्यूंचे प्रमुख कारण मानले जाते.
या जॅकेटमध्ये बॅटरीऐवजी टेथर ट्रिगर सिस्टीम वापरण्यात आली असून अपघात जाणवताच एअरबॅग तत्काळ फुगते. विशेष म्हणजे ही एअरबॅग एकदा उघडली, तरी ती पुन्हा फोल्ड करून वापरता येते. निओकवचने यासोबत Tech Backpack Pro आणि TechPack Air ही एअरबॅग सुरक्षा असलेली नवी उत्पादनेही सादर केली आहेत. Air Vest ची किंमत 32,400 रुपये असून Tech Backpack Pro 40,800 आणि TechPack Air 36,000 रुपये किमतीत उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule