
जळगाव , 15 नोव्हेंबर (हिं.स.) मागच्या काही दिवसापासून सोने-चांदी दरात चढ उतार होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातील दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतल्याचं पाहायला मिळाले. मागच्या दोन दिवसात सोने चांदी दरात घसरण दिसून आली. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या आक्रमक टिप्पण्यांमुळे शनिवारी देशांतर्गत सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १८५४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार ८९६ रूपयांपर्यंत घसरले. दोनच दिवसांत सोन्यात तब्बल ३७०८ रूपयांची घट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे चांदी दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा दर २०६० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ६४ हजार ८०० रूपयांपर्यंत घसरली. दोनच दिवसांत चांदीत तब्बल ५१५० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे आणि ग्राहक पुढील काही महिने सोने आणि चांदीची खरेदी वाढविण्याची शक्यता निर्माण आहे. म्हणून जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर