
मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। झी मराठीवरील दोन दमदार व्यक्तिमत्व, तारिणी आणि कमळी, एकत्र आल्या आहेत थरारक महासंगम-एपिसोडमध्ये. या भागात धैर्य, गूढ साज आणि शक्तीचा संगम घडणार आहे. या भागात, कौशिकी यांच्या आयुष्याला गंभीर धोका निर्माण होणार आहे. युवराज आणि कामिनी यांनी सत्काराच्या हारात बॉम्ब लावून तिची हत्या करण्याचा कट रचला आहे. कमळीला त्या हारात काहीतरी संशयास्पद वाटते आणि ती तत्काळ तारिणीला या धोकेबद्दल सावधान करते. दोघी मिळून लोकांना शांत ठेवत, बॉम्बचं मेकॅनिझम समजून घेत, बॉम्ब निष्क्रिय करण्याच्या तयारीत आहेत. प्रेक्षकांसाठी हा क्षण थरारक अनुभव असणार आहे.
या धाडसी कृती दरम्यान, कमळीला तारिणीची खरी ओळख उघड होणार आहे की ती एक अंडरकव्हर कॉप आहे, जी युवराज आणि कामिनी यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी काम करत होती. कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने टीम तारिणी सोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त करताना सांगितले “तारिणीच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. शिवानी सोनार (तारिणी) हिच्यासोबत मागील शोमधली ओळख होती आणि पुन्हा तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच कमाल होता. माझा एक डान्स परफॉर्मेंस ही या महासंगम एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे. तो परफॉर्मेंस मी फक्त एक तासात शिकेले आणि शूट केला .मी पहिल्यांदाच बिना प्रॅक्टिस इतक्या कमी वेळात डांस शिकले आणि परफॉर्म केल आहे. याच क्रेडिट माझ्या कोरिओग्राफरला ही जात तिच्यामुळे हे शक्य झालं. तारिणी माझ्यासाठी नवीन शैलीची मालिका आहे आणि त्याच्यासाठी शूट करण्याचा अनुभव देखील खूप वेगळा होता. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा कमळी–तारिणीचा महासंगम नक्कीच आवडेल.”
तेव्हा बघायला विसरू नका महासंगम रविवार १६ नोव्हेंबर रोजी संध्या ९:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर