सुझुकीची GSX-R1000R 40 वी वर्धापनदिन विशेष आवृत्ती लॉन्च
मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। जुलै 2025 मध्ये सुझुकीनं युनायटेड किंगडम आणि युरोपियन बाजारपेठांसाठी आपली प्रमुख सुपरबाइक GSX-R1000R ची 40 वी वर्धापनदिन विशेष आवृत्ती सादर केली असून तिची किंमत 17,599 पौंड्स, म्हणजेच सुमारे 20.52 लाख रुपयांपासून सुरू
Suzuki GSX-R1000R 40th Anniversary


मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। जुलै 2025 मध्ये सुझुकीनं युनायटेड किंगडम आणि युरोपियन बाजारपेठांसाठी आपली प्रमुख सुपरबाइक GSX-R1000R ची 40 वी वर्धापनदिन विशेष आवृत्ती सादर केली असून तिची किंमत 17,599 पौंड्स, म्हणजेच सुमारे 20.52 लाख रुपयांपासून सुरू होते. रेट्रो-प्रेरित लिव्हरी, तांत्रिक सुधारणा आणि नवीन विंगलेट्समुळे ही लिमिटेड एडिशन बाइक मोटरसायकल प्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरत आहे.

या मॉडेलमध्ये 1000 सीसी इन्लाइन-फोर इंजिन देण्यात आलं असून यात नवीन क्रँकशाफ्ट, क्रँककेसेस, पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड्सचा समावेश आहे. अपग्रेडेड फ्युएल पंप आणि इंजेक्टर्समुळे इंजिन आता 13,200 आरपीएमवर 193 एचपी शक्ती आणि 11,000 आरपीएमवर 110 एनएम टॉर्क निर्माण करतं. ट्विन-स्पार अ‍ॅल्युमिनियम फ्रेममध्ये बसवलेल्या या इंजिनला कार्बन विंगलेट्सची जोड मिळाली असून उच्च वेगात स्थिरता व डाउनफोर्स वाढवण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. शोवा बॅलन्स फ्री फोर्क्स आणि शॉक अब्जॉर्बर्समुळे राईड क्वालिटी अधिक सुधारली आहे.

ब्रेकिंगसाठी समोर 320 एमएम फ्लोटिंग डिस्कसह चार-पिस्टन ब्रेम्बो मोनोब्लॉक कॅलिपर्स देण्यात आले आहेत. नवीन हलके ABS युनिट आणि ब्रिजस्टोन RS11 टायर्समुळे ट्रॅक्शन आणि नियंत्रणक्षमता अधिक मजबूत झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या विशेष एडिशनमध्ये सहा-अक्षीय IMU, सुझुकी रोल टॉर्क कंट्रोल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, 10-स्तरीय अँटी-व्हीलि सिस्टम, लीन-सेंसिटिव्ह ABS, लॉंच कंट्रोल, स्लोप-डिपेंडंट ब्रेकिंग, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि लो-आरपीएम असिस्ट देण्यात आले आहेत.

ही सुपरबाइक निळा-पांढरा, लाल-पांढरा आणि पिवळा-मॅट निळा या तीन आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. फेअरिंग आणि टँकवर 40 व्या वर्धापनदिनाचे लोगो, बेलीपॅनवर रेट्रो ‘R’, तर सीट आणि सायलेंसरवर खास ब्रँडिंग देऊन या एडिशनला विशेष लुक देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande