कोल्हापूर - थोतांड मांत्रिकाला पोलीसांनी शिकवला चांगलाच धडा
कोल्हापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। गुप्तधनासाठी नरबळी पासून भूतबाधा काढण्यासाठी मध्यरात्री स्मशानात करणी करून अनेकांना अंधश्रद्धेत अडकवून लुटणारा शिरोली पुलाची येथील थोतांड मांत्रिक आता साथीदारांसह कायाद्याच्या कचाट्यात आणि पोलिसांच्या तावडीत सापडल
पोलिसांच्या तावडीत सापडलेला भोंदू मांत्रिक


कोल्हापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। गुप्तधनासाठी नरबळी पासून भूतबाधा काढण्यासाठी मध्यरात्री स्मशानात करणी करून अनेकांना अंधश्रद्धेत अडकवून लुटणारा शिरोली पुलाची येथील थोतांड मांत्रिक आता साथीदारांसह कायाद्याच्या कचाट्यात आणि पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. गावातून धिंड काढून त्याला अद्दल घडवली जात आहे.

हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावातील स्मशानात मध्यरात्री 15 दिवसापूर्वी एक मांत्रिक आपल्या साथीदारांसह मंत्राने भूत बाटलीत बंद करण्याचा प्रकार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. विशेष म्हणजे या व्हिडीओचे त्यांनीच शुटींग केले होते. हा मांत्रिक किशोर लोहार असून तो शिरोली येथीलच असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर माध्यमातून आणि समाजातून प्रतिक्रीया उमटल्या. डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉ. गिरीश फोंडे यांनी याबाबत पोलीसाना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली. त्याची पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी गांभिर्याने दखल घेतली. शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दरम्यान हा मांत्रिक फरार झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपास करून त्याचा शोध घेतला. त्याला पंढरपूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. त्यानंतर त्याचा साथीदार आभिजीत मोहीते हा देखील सापडला. त्यानां अटक केल. किशोर लोहार यांचाकडून दोन साथीदारांच्या मदतीने अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार केल्याचे कबूल करून घेतले तसेच यावर विश्वास ठेवू नये वदवूनही घेतले. न्यायालयातून त्या दोघानांही दोन वेळा पोलीस कोठडी दिली. तपासात शिरोली एमआयडीसी पोलिसांनी पोलीसी खाक्यासह दोघांची गावातून धिंडही काढली. असे समाजविघातक प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला. कोल्हापूर जिल्हयात अंधश्रद्धेचे प्रकार वाढत आहे. त्याला कायद्याचा धाक आणि समाज जागृती हाच उपाय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande