जळगावात बांधकाम व्यावसायिकाला ४४ लाखांचा ऑनलाईन गंडा
जळगाव, 15 नोव्हेंबर (हिं.स.) शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे सायबर ठग महिलेने अमिष दाखविले. त्यानंतर एका ठाम हिलेने कस्टम महिला अधिकारी तर अन्य एका ठग महिलेने बँक अधिकारी बोलत असल्याने भासवित जळगाव जिल्ह्यातील एका बांधक
जळगावात बांधकाम व्यावसायिकाला ४४ लाखांचा ऑनलाईन गंडा


जळगाव, 15 नोव्हेंबर (हिं.स.)

शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे सायबर ठग महिलेने अमिष दाखविले. त्यानंतर एका ठाम हिलेने कस्टम महिला अधिकारी तर अन्य एका ठग महिलेने बँक अधिकारी बोलत असल्याने भासवित जळगाव जिल्ह्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ४४ लाख ५ हजार ७६५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३७ वर्षीय तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. १ सप्टेबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या मोबाईल व्हाट्स क्रमांकावर त्यांच्याशी सायबर ठगांनी डीजीएम शेअर ट्रेडींगमधून बोलत असल्याचे सांगत करिष्मा मित्रा हिने त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच फेसबुकमार्फत त्यांची डिव्हिडसन लिंडा या महिलेशी ओळख झाली होती. डीजीएम शेअर ट्रेडींग या नावाचे ॲपवर तक्रारदार व्यावसायिकाला करिष्मा मिश्रा हिने जाईन केले. या शेअर्स ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देतो. असा आव आणत नफ्याचा खोटा बनाव केला. दिल्ली एअरपोर्टवर अटक करण्यात येणाऱ्या डिव्हिडसन लिंडा यांची सुटका करण्यासाठी कस्टम महिला अधिकारी बोलत असल्याचे भासवित तक्रारदार यांना कायद्याच्या कचाट्यात अडकण्याचा धाक दाखविला. एका ठग महिलेने बँक अधिकारी बोलत असल्याचे वेगळ्या व्हाट्सअप क्रमांकावरुन वेगवेगळ्या कारणे देत संपर्क साधला. तक्रारदार यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या ठग महिलांनी तक्रारदार यांच्याकडून ४४ लाख ५ हजार ७६५ रुपये ९६ पैसे वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन स्वीकारली. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाला कुठल्याही प्रकारची रक्कम परत न करता ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. संशयितांनी आर्थिक लूट केल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात या ठग महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande