'निर्धार' चित्रपटातील युथफूल गाणे प्रदर्शित
रसिकांवर मोहिनी घालणार ''वंदे मातरम...'' गाणे मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। तरुणाईवर आधारलेल्या चित्रपटांनी नेहमीच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अशाच तरुणाईची गोष्ट ''निर्धार'' या आगामी मराठी संगीतप्रधान चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ''
रसिकांवर मोहिनी घालणार 'वंदे मातरम...' गाणे


रसिकांवर मोहिनी घालणार 'वंदे मातरम...' गाणे

मुंबई, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। तरुणाईवर आधारलेल्या चित्रपटांनी नेहमीच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अशाच तरुणाईची गोष्ट 'निर्धार' या आगामी मराठी संगीतप्रधान चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'निर्धार' या शीर्षकातच काहीतरी सांगायचे असल्याचे संकेत देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. मनोरंजनासोबतच प्रबोधन करीत तरुणाईला नवी दिशा देण्याचेही काम करणारा हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील युथफूल गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शित झाल्यापासून हे गाणे सोशल मीडियावर रसिकांचे लक्ष वेधत आहे.

निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली 'निर्धार' चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केले असून, दिग्दर्शन दिलीप भोपळे यांनी केले आहे. 'निर्धार'मधील 'वंदे मातरम...' हे आजच्या तरुणाईच्या उत्स्फूर्त भावना व्यक्त करणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. लेखक-गीतकार दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेले हे गाणे लयश्री वेणुगोपाल आणि ओंकार सोनावणे यांनी गायले आहे. संगीत दिग्दर्शन आणि संगीत, संगीत संयोजन राज जनार्दन पादारे यांनी केले आहे. तरुण मुले-मुली ओपन जीपने रस्त्याने प्रवास करत असतानाचे हे गाणे आहे. त्यातील एक तरुण गिटार, तर दुसरा बासरी वाजवून गाण्यात सुरेल स्वर भरण्याचे काम करतो. अर्थपूर्ण शब्दरचना आणि कर्णमधूर संगीत हे या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. निसर्गरम्य लोकेशन्स आणि प्रसंगानुरूप सिनेमॅटोग्राफी ही या गाण्याची जमेची बाजू आहे. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारे हे गाणे महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. कथानकाला गती मिळवून देणारे हे गाणे चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर येते.

पिकल एंटरटेनमेंट वितरक असलेल्या 'निर्धार'मध्ये डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे हे कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफी अतुल सुपारे यांनी केली असून, नृत्य दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले आहे. कला दिग्दर्शन विकी बिडकर यांनी केलं असून, निर्मिती व्यवस्थापन कैलास भालेराव यांचे आहे. रंगभूषा अतुल शिधये करत असून, वेशभूषा प्रशांत पारकर यांनी केली आहे. राहुल पाटील या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, संतोष जाधव प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. अजय खाडे लाईन प्रोड्युसर, तर अथर्व वालावलकर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande