
बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनत पक्षाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई येथे सपना निखिल डहाळे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड केली आहे. पोलिस मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सपना निखिल डहाळे यांची भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या औचित्याने संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
समाजकार्यासाठी पक्षाचे धोरण आणि कार्यपद्धती उपयुक्त असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे संघटनेला निश्चितच बळकटी मिळणार आहे.
प्रवेश करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये रमल गोरे, शीतल गायकवाड, रेश्मा मारकळ, सुनिता काळे, राधा बावणे, मंगल जाधव, सविता शिंदे, अरुणा शिंदे, सुनिता साळुंके, अशा देशमाने, शोभा देशमाने, सीता हतागळे, अलका हतागळे, सुनिता जाधव, अश्विनी पिसाळ, रेणुका कुलकर्णी, तारामती घाडगे, कौशल्या कांबळे, वंदना गायकवाड, माया सकट, शकु सोनवणे, सविता डाके, निशा तरकसे, लखन कांबळे आणि निखिल डहाळे यांचा समावेश आहे.
--------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis