लातूर: बाभळगाव येथे 9 मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या वतीने लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे 9 मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लातूर चे माजी आमदार दिलीपराव देशमुख
जागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या वतीने


लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या वतीने लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे 9 मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

लातूर चे माजी आमदार

दिलीपराव देशमुख व सुवर्णाताई देशमुख यांच्या समवेत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी विधीवत पुजन करून प्रकल्पाचा शुभारंभ केला . प्रारंभी सर्वांचे श्रध्दास्थान असलेल्या रोकडेश्वर देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेवून आरती केली.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणीय ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार असून शाश्वत विकासासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.महत्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा देखील विज उपलब्ध होवू शकणार आहे.

साखर उद्योगात मांजरा परिवारातील साखर कारखाने उत्तम कार्य करत असून यातून इतरांना प्रेरणा मिळत आहे.यावेळी जागृती शुगर्सच्या सर्व सदस्यांना या प्रकल्पासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande