
बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।माजलगाव नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माजलगाव नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे यासाठी भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख सुरेश धस यांनी माजलगाव येथे तळ ठोकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा येथे सामना होणार असल्याचे दिसते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजलगाव नगरपरिषदेमध्ये युती करणार नाही. कोणत्याही पक्षाशी समझोता करणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. माजलगाव, धारुर मध्ये युती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis