राष्ट्रवादीचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांचा तडका फडकी राजीनामा
बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड जिल्हा विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक निवडणूक प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे
योगेश क्षीरसागर


बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड जिल्हा विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे.

स्थानिक निवडणूक प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता परंतु त्यांनी राजीनामा देऊन खळबळ केली.

आपल्या राजीनामा पत्रात क्षीरसागर म्हणतात, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी काम करत होतो. परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणिवपूर्वक डावलले जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या कडे सुपूर्द करत आहे.

तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातून मी पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार मानतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande