टाटा सिएराचे प्रोडक्शन व्हर्जन अनव्हील, डीलरकडून बुकिंगला सुरुवात
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपल्या अत्यंत प्रतिक्षित असलेल्या टाटा सिएरा एसयूवीचे प्रोडक्शन-स्पेक व्हर्जन अखेर अनव्हील केले आहे. आयकॉनिक 1990 च्या दशकातील सिएराला आधुनिक रूप देत कंपनीने पुन्हा एकदा हा लोकप्रिय नाविन्य
Tata Sierra production version unveiled


मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपल्या अत्यंत प्रतिक्षित असलेल्या टाटा सिएरा एसयूवीचे प्रोडक्शन-स्पेक व्हर्जन अखेर अनव्हील केले आहे. आयकॉनिक 1990 च्या दशकातील सिएराला आधुनिक रूप देत कंपनीने पुन्हा एकदा हा लोकप्रिय नाविन्यपूर्ण मॉडेल बाजारात आणण्याची तयारी केली आहे. अधिकृत लॉन्च २५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्याआधीच सिएराच्या ICE व्हर्जनसाठी काही डीलर्सनी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. हे बुकिंग कंपनीच्या अधिकृत प्रक्रियेचा भाग नसून, डीलर-लेव्हलवर ग्राहकांची प्राथमिक मागणी आणि आवड जाणून घेण्यासाठी घेतले जात आहेत. काही ठिकाणी २१,000 रुपयांपासून टोकन रकमेवर ग्राहकांचे तपशील आणि पसंतीचे व्हेरिएंट नोंदवले जात आहेत.

नव्या टाटा सिएराचे डिझाइन पारंपारिक बॉक्सी स्टाइल आणि आधुनिक स्टाइलिंगचा सुंदर संगम आहे. एसयूवीचे उभट, दमदार स्टान्स, ग्लॉस-ब्लॅक पॅनेल्ससह LED हेडलाइट्स, DRLs, ब्रँड लोगो आणि ‘Sierra’ लेटरिंगला जोडणारी स्टायलिश फ्रंट प्रोफाइल यामुळे अधिक आकर्षक बनले आहे. पुढील बंपरमध्ये दिलेले स्किड प्लेट आणि ट्विन फॉग लॅम्प्स यामुळे एसयूवीचा रग्ड लूक अधिक ठळक दिसतो.

कॅबिनच्या बाबतीत, टाटा सिएरा तंत्रज्ञानाने भरलेले प्रीमियम इंटीरियर देणार आहे. डॅशबोर्डवर तीन डिस्प्ले देण्यात आले आहेत—एक ड्रायव्हरसाठी तर दोन इन्फोटेनमेंटसाठी, आणि हे सर्व स्क्रीन एकमेकांसोबत कंटेंट शेअर करू शकतात. टाटा कर्व्हमध्ये वापरलेला चार-स्पोक स्टीअरिंग व्हील सिएरामध्येही असून मध्यभागी इल्युमिनेटेड लोगो आणि टच-सेन्सिटिव्ह कंट्रोल्स देण्यात आले आहेत. काळ्या-राखाडी थीमवरील कॅबिनमध्ये C-पिलरपर्यंत जाणारे पॅनोरामिक सनरूफ, दुहेरी रंगसंगतीतील सीट्स, प्रत्येक सीटला 3-पॉइंट सीटबेल्ट आणि ॲडजस्टेबल हेडरेस्ट्स देण्यात आले आहेत.

इंजिनच्या बाबतीत, नवीन टाटा सिएरामध्ये कंपनीचा १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे, ज्याची पहिली झलक ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दाखवली होती. हे इंजिन सुमारे १७० hp पॉवर आणि २८० Nm टॉर्क देईल. यासोबतच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्सची निवडही उपलब्ध असेल. त्याशिवाय, टाटा १.५-लिटर नैसर्गिक एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिनचा पर्यायही देणार असल्याची माहिती आहे. तसेच, कर्व्ह आणि नेक्सॉनमध्ये वापरले जाणारे १.५-लिटर डिझेल इंजिन – ११८ hp पॉवर आणि २६० Nm टॉर्कसह—सिएरामध्येही मिळणार आहे.

आधुनिक सुविधांनी परिपूर्ण, दमदार डिझाइन आणि नव्या इंजिन पर्यायांसह टाटा सिएरा भारतीय बाजारात पुन्हा एकदा एसयूव्ही सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा निर्माण करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande