
मेक्सिको सिटी , 16 नोव्हेंबर (हिं.स.)। मेक्सिकोमध्ये वाढत्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराविरोधात ‘जेन झेड’ च्या आवाहनावर शनिवारी हजारो युवक रस्त्यावर उतरले आणि मोठे प्रदर्शन केले. या दरम्यान प्रदर्शनकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. निदर्शकांनी दगड, हातोडा, फटाके, काठ्या आणि साखळ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या झटापटीत एकूण 120 जण जखमी झाले आहेत तर 20 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
हे आंदोलन मुख्यत्वे राष्ट्राध्यक्षा क्लाउडिया शेनबाउम यांच्या सुरक्षा धोरणांवर आणि ड्रग कार्टेलविरोधातील शिथिल भूमिकेविरुद्ध आहे. विशेषत: मिचोआकान राज्यात ड्रग तस्करांविरुद्ध कार्यवाही करणारे महापौर कार्लोस मंजो यांच्या हत्येनंतर या आंदोलनाला आणखी वेग आला आहे.जेन झेडच्या या आंदोलनाला विरोधी पक्षांतील विविध वयोगटातील नेते आणि समर्थकांनी खुलेपणाने पाठिंबा दिला असून त्यामुळे हे आंदोलन आता व्यापक स्वरूप धारण करत आहे. बहुतांश प्रदर्शन शांततापूर्ण होते, परंतु शेवटी काही तरुण आणि पोलिसांमध्ये संघर्ष उफाळला. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगड, फटाके, लाठ्या आणि साखळ्या फेकल्या तसेच पोलिसांच्या ढाली आणि इतर साधने हिसकावून घेतली. राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राष्ट्रीय राजवाड्याच्या सुरक्षा भिंती जेन-जी ने तोडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीचार्जही केला.
राजधानीचे सुरक्षा सचिव पाब्लो वाझक्वेझ यांनी सांगितले की या झटापटीत एकूण 120 जण जखमी झाले असून त्यापैकी 100 जण पोलिस अधिकारी आहेत. या प्रकरणात 20 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ओढत नेणे आणि बलप्रयोग करताना दिसल्याने मनमानी अटक आणि दुरुपयोगाचे आरोपही झाले.
या आंदोलनात केवळ तरुणच नव्हे, तर विविध वयोगटातील नागरिक सहभागी झाले. माजी राष्ट्राध्यक्ष विसेंट फॉक्स आणि मेक्सिकन अब्जाधीश रिकार्डो सालिनास प्लिएगो यांनी सोशल मीडियावर या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी नॅशनल पॅलेस (पलासिओ नासिओनाल) परिसरातील बॅरिकेड्स तोडले आणि राष्ट्राध्यक्षा शेनबाउम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अनेकांनी ‘वन पीस’ या कार्टूनमधील समुद्री चाच्यांच्या कवटीचा झेंडा फडकावला, जो जेन झेडच्या जागतिक आंदोलनाचा प्रतीक बनला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode