
नेपीडॉ, 16 नोव्हेंबर (हिं.स.) म्यानमारमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 नोंदली गेली आहे.
एनसीएसच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीखालच्या 10 किलोमीटर खोलीवर होते. त्यामुळे हा प्रदेश आफ्टरशॉकसाठी अतिसंवेदनशील ठरतो.एनसीएसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की 16 नोव्हेंबर 2025 रोजी म्यानमारमध्ये पहाटे 2 वाजून 40 मिनिटांनी 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 10 किमी खोलीवर होते.
याआधी 14 नोव्हेंबर रोजी या भागात 35 किलोमीटर खोलीवर 3.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तर 28 मार्च रोजी मध्य म्यानमारमध्ये आलेल्या 7.7 आणि 6.4 तीव्रतेच्या भूकंपांनंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भूकंपग्रस्त भागांत विस्थापित झालेल्या हजारो लोकांना वाढत्या आरोग्यधोक्यांबाबत इशारा दिला होता. म्यानमार मध्यम आणि मोठ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या धोक्यासाठी संवेदनशील मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode