विवो X300 सिरीज २ डिसेंबरला भारतात होणार लॉन्च
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। स्मार्टफोन बाजारात स्पर्धा वाढत असताना विवो कंपनीने आपल्या नवीन फ्लॅगशिप मालिकेची घोषणा केली असून विवो X300 सिरीज भारतात पुढील महिन्यात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. विवोने भारतातील लॉन्चिंगची तारीख जाहीर करताना सांगितल
Vivo X300 series


मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। स्मार्टफोन बाजारात स्पर्धा वाढत असताना विवो कंपनीने आपल्या नवीन फ्लॅगशिप मालिकेची घोषणा केली असून विवो X300 सिरीज भारतात पुढील महिन्यात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. विवोने भारतातील लॉन्चिंगची तारीख जाहीर करताना सांगितले की दोन्ही मॉडेल्स २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भारतीय बाजारात सादर केले जातील. कंपनी हे फोन्स खास लॉन्च इव्हेंटमधून सादर करणार की सॉफ्ट लॉन्चद्वारे, याबाबत स्पष्टता दिलेली नाही. जर लाईव्ह इव्हेंट आयोजित करण्यात आला तर ग्राहकांना व्हिवोच्या सोशल मीडिया हँडल्स आणि अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रसारण पाहता येईल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लाइनअपमध्ये विवो X300 आणि विवो X300 Pro हे दोन मॉडेल्स असतील. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अत्याधुनिक Zeiss-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम देण्यात आला असून भारतात ही मालिका एक्सक्लुसिव्ह रेड कलर ऑप्शन सह उपलब्ध होणार आहे. ही सिरीज १३ ऑक्टोबरला चीनमध्ये आणि त्याच महिन्यात जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आली होती.

X300 सिरीजसाठी कंपनीने खास टेलीफोटो एक्सटेंडर किट चाही टीझर दिला आहे. या किटमध्ये Zeiss 2.35x टेली-कन्व्हर्टर लेंस असून ऑप्टिकल झूमची क्षमता अधिक अचूकतेसह वाढवते. हे लेंस टेलीकन्व्हर्टर मोडसोबत कम्पॅटिबल असून NFC सपोर्टमुळे इंस्टंट लेंस रिकग्निशन आणि ऑटो-ऍक्टिवेशनची सुविधाही मिळते.

परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास भारतात येणाऱ्या विवो X300 सिरीजमध्ये अत्याधुनिक 3nm मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट देण्यात येणार आहे. यासोबत Pro Imaging VS1 चिप आणि V3+ इमेजिंग चिपची जोड मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये अँड्रॉइड 16-बेस्ड ओरिजिनओएस 6 ऑपरेटिंग सिस्टमवर काम केले जाईल.

कॅमेरा विभागात विवो X300 Pro मॉडेल विशेषत्वाने लक्षवेधी ठरत आहे. यात 50MP सोनी LYT-828 प्राइमरी कॅमेरा (f/1.57), 50MP सॅमसंग JN1 अल्ट्रा-वाइड लेन्स (f/2.0) आणि 200MP HPB APO टेलीफोटो कॅमेरा (f/2.67) असा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 50MP सॅमसंग JN1 (f/2.0) कॅमेरा उपलब्ध असेल.

स्टँडर्ड विवो X300 मध्येही दमदार कॅमेरा कॉन्फिगरेशन मिळणार आहे. यात 200MP HPB OIS मेन कॅमेरा (f/1.68), 50MP सोनी LYT-602 टेलीफोटो OIS कॅमेरा (f/2.57) आणि 50MP सॅमसंग JN1 अल्ट्रावाइड (f/2.0) कॅमेरा देण्यात येणार आहे. फ्रंट कॅमेराच्या बाबतीत यातही 50MP सॅमसंग JN1 लेन्स असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande