रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्यासाठी ट्रम्प प्रशासन लवकरच नवीन कायदा आणणार
वॉशिंग्टन , 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन लवकरच एक नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे, ज्याअंतर्गत रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादले जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा
रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्यासाठी ट्रम्प प्रशासन लवकरच नवीन कायदा आणणार


वॉशिंग्टन , 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन लवकरच एक नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे, ज्याअंतर्गत रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादले जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की त्यांची पार्टी एक असे विधेयक आणत आहे, ज्यामुळे रशियाशी व्यापार करणे कोणत्याही देशासाठी अत्यंत कठीण होईल.

ट्रम्प म्हणाले, “रशियाचे व्यापारी भागीदार देश यूक्रेन युद्धाला अर्थपुरवठा करण्यासाठी जबाबदार आहेत, विशेषत: रशियाकडून कच्चे तेल आणि गॅस खरेदी करणारे देश.” त्यांनी सांगितले की रिपब्लिकन पार्टी असे विधेयक आणत आहे ज्यात रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर अत्यंत कठोर निर्बंधांचा समावेश असेल.

दरम्यान, रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये भारत आणि चीन यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या नवीन कायद्यामुळे भारताची अडचण वाढू शकते. अमेरिका आधीच भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लादले आहे. अमेरिकेचे मत आहे की रशियाच्या यूक्रेन युद्धाला अर्थपुरवठा करण्यात भारत आणि चीनचा मुख्य सहभाग आहे. या नवीन कायद्यामुळे भारत, चीन यांच्यासोबत इराणचीही अडचण वाढू शकते.

एका बाजूला अमेरिका रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार सातत्याने वाढत आहे. 2030 पर्यंत दोन्ही देशांनी परस्पर व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भारत आणि रशिया यांच्यात इंडिया–यूरेशियन इकॉनॉमिक युनियन मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे.

एका अहवालानुसार,जर अमेरिकेचे हे विधेयक पारित झाले, तर ट्रम्प त्या देशांकडून होणाऱ्या आयातीवर 500 टक्क्यांपर्यंत शुल्क लावू शकतील, जे रशियाकडून कच्चे तेल किंवा गॅस खरेदी करतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande