'तो' लव्ह जिहाद प्रेमी पोलिसांच्या ताब्यात
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या घरातून अपहरण केले, या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनीं''लव्ह जिहादचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दहा दिवसांनंतर, सोमवा
'तो' लव्ह जिहाद प्रेमी पोलिसांच्या ताब्यात


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या घरातून अपहरण केले, या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनीं'लव्ह जिहादचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दहा दिवसांनंतर, सोमवारी, पोलिसांनी कथित लव्ह जिहाद प्रियकराला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिस ठाण्यात आणले. गावकऱयांना हे कळताच, मोठी गर्दी जमली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माणझाले. त्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी कडक पोलिस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

नांदगावपेठ येथील एका विवाहित महिलेचे फूस लावून अपहरण केल्याच्या घटनेमुळे गावात तीव्र संताप निर्माण झाला. त्यानंतर, महिलेच्या पतीने ७ नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी पुरुषाने त्याच्या पत्नीला प्रेमाच्या बहाण्याने पळवून नेले, असा आरोप पतीने तक्रारीत केला होता. या महिलेला पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे, या दोन्ही चिमुकल्याची आई अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळेया प्रकरणात ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांचा रोष वाढला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संताप वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची इशारा दिला होता. दरम्यान, पोलिसांचे पथक आरोपीच्या गावाला भेट देऊन रिकाम्या हाताने परतले, त्यांना काहीही सापडले नाही, मात्र वाद वाढण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनीलव्ह जिहादच्या त्या कथित महिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आणि सोमवारी संध्याकाळी त्यांना पोलिस ठाण्यात आणले. ग्रामस्थांना हे कळताच, गर्दी जमली आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तणावाची स्थितीमाहून पोलिस ठाण्याच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. परिणामी, दामिनी पथक, क्यूआरटी कमांडो आणि स्थानिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली महिलेला वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, जिल्हा रुग्णालयाचे चॅनेल गेट देखील बंद करण्यात आले. आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पोलिस रात्री उशिरापर्यंत प्रकरणाचा तपास करीत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande