रत्नागिरी : मंडणगड तालुक्यात शिरगाव येथे मोटारीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : शिरगाव (ता. मंडणगड) येथे आज पहाटे पाचच्या सुमारास नाशिकहून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात शंकर करमरकर (वय सुमारे ५०, देहेण, ता. दापोली) आणि हर्षदा जोशी (वय सुमारे ७०, टिळक आळी, रत्ना
अपघातग्रस्त मोटार


रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : शिरगाव (ता. मंडणगड) येथे आज पहाटे पाचच्या सुमारास नाशिकहून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात शंकर करमरकर (वय सुमारे ५०, देहेण, ता. दापोली) आणि हर्षदा जोशी (वय सुमारे ७०, टिळक आळी, रत्नागिरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात प्रमोद मुकुंद लिमये (६०) आणि ओंकार प्रमोद लिमये (३५, दोघेही राहणार केळशी, ता. दापोली) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता मंडणगड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे.

पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या वहाळात उलटून हा अपघात झाला. अपघाताचा पुढील तपास त्या मंडणगड पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande