वॉबल वन स्मार्टफोन भारतात लॉंच
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। इंडकल टेक्नॉलॉजीजच्या मालकीचा नवीन स्मार्टफोन ब्रँड ‘वॉबल’नं भारतात आपला पहिला फोन ‘वॉबल वन’ अधिकृतपणे लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 12 डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून मिड-रेंज सेगमेंटमध्ये द
Wobble One Smartphone


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। इंडकल टेक्नॉलॉजीजच्या मालकीचा नवीन स्मार्टफोन ब्रँड ‘वॉबल’नं भारतात आपला पहिला फोन ‘वॉबल वन’ अधिकृतपणे लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 12 डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून मिड-रेंज सेगमेंटमध्ये दमदार फिचर्ससह उतरला आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, वॉबल वन हा भारतात अँड्रॉइड 15 आउट-ऑफ-द-बॉक्स देणार आहे. गूगलच्या एआय फीचर्सचा समावेश, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट यामुळं हा फोन वापरकर्त्यांसाठी प्रीमियम अनुभव देणारा ठरणार आहे.

या स्मार्टफोनची किंमत बेस व्हेरियंट (8GB RAM + 128GB स्टोरेज) साठी 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 8GB + 256GB आणि 12GB + 256GB असे दोन हायर व्हेरियंटसुद्धा उपलब्ध होणार आहेत, मात्र त्यांच्या किंमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. हा फोन मिथिक व्हाईट, एक्लिप्स ब्लॅक आणि ओडिसी ब्ल्यू या तीन रंगांमध्ये विक्रीस येईल.

6.67 इंच फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट यामुळे मल्टिमीडिया अनुभव अधिक समृद्ध होतो. परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 7400 हा 4nm आधारित शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2.6GHz पीक स्पीड प्रदान करतो. गेमिंगसाठी कंपनीचं Epic HyperEngine तंत्रज्ञानही जोडण्यात आलं आहे.

कॅमेराच्या बाबतीत वॉबल वनमध्ये 50 मेगापिक्सेलचा OIS सपोर्ट असलेला Sony LYT-600 मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड + Bokeh लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा असा ट्रिपल रिअर सेटअप आहे. ‘वॉबल मोड’ नावाचं विशेष फोटोग्राफी फीचरही यात देण्यात आलं आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा पंच-होल कटआउटमध्ये उपलब्ध आहे.

फोनचं रिअर पॅनेल ग्लासचं असून फ्रेम अ‍ॅल्युमिनियम अलॉयची आहे. 7.8 मिमी जाडीमुळे हा फोन हलका आणि स्लीक लूक देतो. USB टाइप-C पोर्टबरोबरच 3.5 मिमी हेडफोन जॅकही उपलब्ध ठेवण्यात आला आहे. बॅटरीची अचूक क्षमता कंपनीनं जाहीर केलेली नसली तरी 47 तास कॉलिंग, 24 तास व्हिडिओ प्लेबॅक आणि तब्बल 22 दिवस स्टँडबाय बॅटरीचा दावा करण्यात आला आहे.

22,000 रुपये किंमत श्रेणीत वॉबल वनला रेडमी, रियलमी, मोटोरोला आणि सॅमसंगच्या मॉडेल्सशी कडवी स्पर्धा करावी लागणार आहे. तरीही Android 15, दमदार चिपसेट, OIS कॅमेरा आणि प्रीमियम ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानामुळे हा फोन बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा कंपनीचा विश्वास आहे. इंडकल टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून वॉबल ब्रँड ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उत्पादन करत असून आगामी काळात आणखी नवे मॉडेल्स सादर करण्याची योजना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande