वनप्लस 15आर भारतात लवकरच होणार लॉन्च
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। वनप्लसने वनप्लस 15 मालिकेनंतर लगेच भारतात वनप्लस 15आर ची अधिकृत घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन थेट अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या ऑक्सिजनओएस 16 सह लॉन्च होणार असून कंपनीनं यावेळी पारंपरिक अलर्ट स्लायडर काढून टाकत त्याच्या जाग
OnePlus 15R


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। वनप्लसने वनप्लस 15 मालिकेनंतर लगेच भारतात वनप्लस 15आर ची अधिकृत घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन थेट अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या ऑक्सिजनओएस 16 सह लॉन्च होणार असून कंपनीनं यावेळी पारंपरिक अलर्ट स्लायडर काढून टाकत त्याच्या जागी नवीन ‘प्लस की’ दिली आहे. ही बहुउद्देशीय की व्हॉल्यूम प्रोफाइल बदलणे, कॅमेरा शटर, रेकॉर्डिंग सुरू करणे आणि विशेष ‘प्लस माइंड’ फीचरद्वारे झटपट मेमरीज कॅप्चर करणे अशी अनेक कामे करू शकणार आहे.

वनप्लस 15आर हा चीनमध्ये काही आठवड्यांपूर्वी लॉन्च झालेल्या वनप्लस एसीई 6 चा रिब्रँडेड अवतार असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे त्यातील बहुतांश स्पेसिफिकेशन्स एसीई 6 प्रमाणेच असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.डिझाइनच्या बाबतीत या फोनमध्ये 6.83 इंचाची 1.5K रिझॉल्यूशनची LTPS AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे, जी 165Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करते. गेमिंग, स्क्रोलिंग आणि एकूणच व्हिज्युअल अनुभवासाठी हा डिस्प्ले अधिक स्मूथ आणि प्रतिसादक्षम ठरणार आहे. फोनला IP66, IP68, IP69 आणि IP69K या चारही उच्चस्तरीय धूळ- पाणी प्रतिरोधक रेटिंग्स मिळाल्या आहेत. OnePlus 15 प्रमाणेच हा मिड-रेंज डिव्हाईसदेखील फ्लॅगशिप-लेव्हल टिकाऊपणा देणार आहे.

कॅमेराबाबत मात्र थोडा डाउनग्रेड दिसून येतो. Ace 6 मध्ये 50 मेगापिक्सलचा OIS सपोर्ट असलेला प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. गेल्या वर्षीच्या OnePlus 13R मध्ये असलेली टेलिफोटो लेन्स यंदा उपलब्ध होणार नसल्याची शक्यता आहे. हॅसलब्लॅड ब्रँडिंगही नसले तरी कंपनीचा ‘DetailMax Engine’ वापरला जाणार असून त्यामुळं फोटो क्वालिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.बॅटरी हा या फोनचा सर्वात मोठा हायलाइट ठरणार आहे. OnePlus 15R मध्ये तब्बल 7,800mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. मात्र R सिरीजच्या परंपरेनुसार यंदाही वायरलेस चार्जिंग उपलब्ध होणार नाही. परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Gen 3 किंवा त्याच्याजवळचा प्रीमियम चिपसेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जो गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी पुरेसा ताकदवान असेल.

कलर ऑप्शन्सबाबत बोलायचे तर चीनमधील Ace 6 तीन रंगात आला होता—Competitive Black, Flash White आणि Quicksilver. भारतातही हे किंवा त्याच धाटणीचे रंग उपलब्ध होऊ शकतात. किंमतीत मात्र वाढ अपेक्षित आहे. Ace 6 चा बेस व्हेरियंट चीनमध्ये 5,599 युआन म्हणजे सुमारे 32,000 रुपये किंमतीत उपलब्ध झाला. भारतात गेल्या वर्षी OnePlus 15R ची सुरुवातीची किंमत 42,999 रुपये होती; यंदा ती 45,000 ते 47,000 रुपयांदरम्यान असण्याचा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande