
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। मोटोरोला कंपनीनं अखेर भारतात आपल्या नवीन ‘मोटो जी57 पॉवर ’ स्मार्टफोनच्या लॉन्चची अधिकृत तारीख जाहीर केली असून हा फोन 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय बाजारात दाखल होणार आहे. स्नॅपड्रॅगन 6एस जनरेशन 4 चिपसेटसह येणारा हा देशातील पहिलाच स्मार्टफोन ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मोटो जी57 5जी आणि मोटोरोला एज 70 सोबत हा मॉडेल जागतिक स्तरावर प्रदर्शित झाला होता. भारतात लॉन्चनंतर मोटो जी57 पॉवर फ्लिपकार्ट, मोटोरोलाची अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
भारतामध्ये या फोनची किंमत 13,000 रुपयांपेक्षा कमी असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन 279 युरो (सुमारे 28,000 रुपये) किंमतीत उपलब्ध असून नुकताच लॉंच झालेल्या मोटो जी57 पॉवर नंतर आता जी57 पॉवर मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे.नवीन स्नॅपड्रॅगन 6एस जनरेशन 4 प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह हा फोन उत्कृष्ट परफॉर्मन्स देणार आहे. यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 7,000 एमएएचची सिलिकॉन-कार्बन बॅटरी जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोठ्या बॅटरी बॅकअपची गरज असणाऱ्यांसाठी हा एक मोठा पर्याय ठरणार आहे.डिस्प्लेसाठी 6.72 इंच फुल एचडी+ एलसीडी पॅनेल, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1,050 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. ड्युअल स्टिरीयो स्पीकर्ससह डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेझ ऑडिओ सपोर्टमुळे ऑडिओ अनुभव अधिक दर्जेदार होणार आहे.
सॉफ्टवेअरच्या दृष्टीने मोटो जी57 पॉवर आऊट-ऑफ-द-बॉक्स अँड्रॉइड 16 वर चालेल आणि अँड्रॉइड 17 पर्यंत एक मोठा ओएस अपडेट तसेच तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याची शक्यता आहे.कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी LYTIA-600 मुख्य सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स देण्यात आला असून सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मजबुत बिल्डसाठी गोरिला ग्लास 7आय, MIL-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन आणि IP64 रेटिंगमुळं हलक्या धूळ-पाण्यापासून संरक्षण मिळतं.
डिझाइनमध्ये ‘पँटोन क्युरेटेड-व्हेगन लेदर’ फिनिश देण्यात आली असून हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये सादर होणार आहे. मिड-रेंज आणि बजेट श्रेणीतल्या ग्राहकांसाठी भरपूर वैशिष्ट्यांसह येणारा मोटो जी57 पॉवर रेडमी, रियलमी आणि सॅमसंगच्या मॉडेल्सला मजबूत स्पर्धा देणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule