
महानुभावीय सांकेतिक 'सकल लिपी' विषयावर होणार मंथनअमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिदी विश्वविद्यालयाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्र, रिद्धपूरतर्फे 20 व 21 नोव्हेंबर रोजी महानुभावीय सांकेतिक 'सकल लिपी' अध्ययन विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आर कार्यशाळेचे उद्घाटन विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा करतील. उद्घाटन समारंभात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे कुलगुरू प्रो. अविनाश आवलगावकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्षकविश्वर कुलाचार्य प.पू.प.म. श्री कारंजेकर बाबा हे समारंभाचे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विश्वविद्यालयाचेनिवासी लेखक डॉ. भूषण भावे विशेष अतिथी राहतील, तर कार्यकारी कुलसचिव कादर नवाज़ खान आणिदर्शनवसंस्कृतीविभागाचे असोशिएट प्रोफेसर डॉ. जयंत उपाध्याययांची विशेष उपस्थिति राहील. उद्घाटन सत्राचे संचालन अनुवादक डॉ. स्वप्निल मून करतील तर डॉ. नितीन रामटेके आभार मानतील. कार्यशाळेत देश-विदेशातील शंभरहून अधिक प्रतिनिधी भाग घेणार आहेत. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रथम सत्र सकल लिपीची ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयावर होईल. या सत्रासाठी विशेष तज्ज्ञ म्हणून श्री चक्रधर कोठी उपस्थित राहतील. द्वितीय सत्रात महानुभावीय सकल लिपीच्या वर्णमालेच्या अध्ययनावर विशाल हिवरखेडकर मार्गदर्शन करतील. 21 नोव्हेंबर रोजी तृतीय सत्र सकल लिपीतील शब्दलेखन आणि पठन या विषयावर असेल. या सत्राचे विशेष तज्ज्ञम्हणून श्री चक्रधर कोठी उपस्थित राहतील. चतुर्थ सत्र सकल लिपीतील सांकेतिक चिन्हांचे अध्ययन आणि पठन या विषयावर असेल व या सत्रात श्री विशाल हिवरखेडकर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेचा समारोप सत्र 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होईल. या सत्राचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबा उर्फ महंत श्री गोपिराज बाबा भूषवतील. प्रमुख अतिथी म्हणून रिद्धपूर केंद्राच्या प्रभारी डॉ. नीता मेश्राम तर शोध अनुषंगी श्री चक्रधर कोठी आणि श्री विशाल हिवरखेडकर उपस्थित राहतील. कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन रिद्धपूर केंद्राच्या प्रभारी व कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. नीता मेश्राम यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी