राष्ट्रीयअन्नसुरक्षा अभियानात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, एसएओंचे आवाहन
अकोला, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडध
राष्ट्रीयअन्नसुरक्षा अभियानात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, एसएओंचे आवाहन


अकोला, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य व नवीन बियाणे अर्थसहाय्य २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा (१० वर्षाआतील) बियाणे रु.५००० प्रति क्वि. (क्षेत्र ०.२० ते २.०० हे. ) मर्यादेत वितरित करण्यात येत आहे. हरभरा या पिकाच्या अनुदान तत्वावर बियाणे लाभ मिळण्याकरिता सातबारा व फार्मर आयडीसह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

--------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande