
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील भोगाव ते इटोली मार्गावरील कमलजाई देवी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वनविभागाने नागरिकांना विशेषतः या मार्गावर दुचाकीने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच संध्याकाळी व रात्रीच्या वेळेत या परिसरात अनावश्यक फिरणे पूर्णतः टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून परिसरात तातडीने आवश्यक खबरदारीची पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सावध राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis