लातूर - औसा नगरपरिषद निवडणूक कार्यकर्ता मेळावा व प्रचाराचा शुभारंभ
लातूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। औसा नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-रिपाई (अ) महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रचार शुभारंभाची भव्य सभा औसा येथे पार पडली. हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत विकासाचा मंत्र
औसा नगरपरिषद निवडणूक कार्यकर्ता मेळावा व प्रचार शुभारंभ


लातूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। औसा नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-रिपाई (अ) महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रचार शुभारंभाची भव्य सभा औसा येथे पार पडली. हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत विकासाचा मंत्र आणि एकतेचे तंत्र अंगीकारत महायुतीला भव्य विजय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचे सर्व डाव उधळून लावत, यंदाच्या निवडणुकीत औसा नगरपरिषदेला विकासाच्या नवीन मार्गावर नेण्याचा संकल्प औसेकरांनी यावेळी दृढ केला असल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे

या प्रसंगी माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, आमदार अभिमन्य पवार, आमदार रमेशआप्पा कराड, शिवाजीराव माने, सुभाष जाधव, बसवराज धाराशिवे, शिरीष उटगे, संगमेश्वर ठेसे, किरण उटगे, संतोषआप्पा मुक्ता, शिवरुद्र मुरगे, चंद्रशेखर सोनवणे, सुनील उटगे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई महादेव बनसोडे, कल्पनाताई डांगे, भीमाशंकर राचट्टे, सुधीर पोतदार, प्रकाश आष्टे, सुनील मिटकरी तसेच भाजप-शिवसेना-रिपाई (अ) महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande