
बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यात उद्या शुक्रवार पर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अनेकांची मनधरणी करण्यासाठी विविध पक्षांचे प्रयत्न करीत आहेत बीड जिल्ह्यात ६ नगरपालिकांच्या निवडणुका होत असून यात सर्वात मोठी पालिका म्हणून बीड पालिका आहे. येथून ५२ नगरसेवकांसह एक नगराध्यक्ष निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. एकूण ८२२ अर्ज आले होते. त्यापैकी २१५ अर्ज अवैध झाले तर ६०७ अर्ज पात्र झाले. नगरसेवकपदाचे ७७५ पैकी ५७७अर्ज वैघ झाले असून १९८ अवैध झाले आहेत. नगराध्यक्षपदाचे ४७पैकी ३० वैघ तर १७ अवैध झाले आहेत.
परळीमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण ३८ अर्ज आले होते. त्यापैकी २३ वैध झाले. नगरसेवकपदासाठी ५३४ अर्ज आले होते. त्यापैकी २३७अर्ज वैध झाले आहेत.याशिवाय गेवराईत नगराध्यक्षपदासाठी २१ पैकी १० अर्ज वैध तर ११ अवैध ठरले. नगरसेवकपदासाठी १३७ पैकी २२ अर्ज अवैध ठरले.
माजलगावात नगराध्यक्षपदासाठी ४१ पैकी १३ अवैध, नगरसेवकपदासाठी ४८९ पैकी १३० अर्ज अवैध ठरले. अंबाजोगाईत नगराध्यक्षपदासाठी २२ पैकी ७ अवैध, नगरसेवकपदासाठी २०५ पैकी ६१ अवैध, तर धारूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी १६ पैकी ४ अवैध, नगरसेवकपदासाठी १५१ पैकी ३६ अवैध झाले आहेत.बीड पालिकेतून ५२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष निवडून येणार आहेत. त्यासाठी नगरसेवकपदासाठी ५७७ अर्ज वैध झालेले आहेत, तर ३० अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी वैध आहेत. शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी गर्दी झाली होती. शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis