बीड : धारूर पालिका निवडणूक प्रचारात पाणी प्रश्न ठरणार निर्णायक मुद्दा
पंधरा दिवसांनी नळाला पाणी येणे हा प्रकार कायम बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। धारूर नगर परिषद निवडणूकीचा प्रचार आता सुरु झाला आहे. शहराचा अनेक वर्षांपासून रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न यंदाच्या नगर पालिका निवडणूकीत प्रचाचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आह
बीड : धारूर पालिका निवडणूक प्रचारात पाणी प्रश्न ठरणार निर्णायक मुद्दा


पंधरा दिवसांनी नळाला पाणी येणे हा प्रकार कायम

बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

धारूर नगर परिषद निवडणूकीचा प्रचार आता सुरु झाला आहे. शहराचा अनेक वर्षांपासून रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न यंदाच्या नगर पालिका निवडणूकीत प्रचाचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे.

धारूर शहराला सध्या धनेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु काही भागात दहा दिवसांनी, तर काही भागात पंधरा दिवसांनी नळाला पाणी येणे हा प्रकार कायम आहे. प्रशासन असो किंवा निवडून आलेली सत्ता पाण्याचा तुटवडा शमवण्यात कोणालाही यश आले नाही, ही कटू वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना हातपंप, स्थानिक विहिरी व खाजगी टैंकर्सवर अवलंबून राहावे लागते

दरम्यान, शहरासाठी पूर्वी मंजूर झालेली १९ कोटींची योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर नगरोत्थानअभियानांतर् गत ६५ कोटी रुपयांची नवी योजना मंजूर झाली असून गेल्या वर्षभरापासून या कामांना गती मिळाली आहे.

या निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार कुंडलिका पाणीपुरवठ्याबाबत ठोस आणि कालबद्ध हमी देईल, त्याच्याकडे मतदारांचा कल झुकू शकतो, निवडणुकीत पाण्याबरोबरच अन्य प्रश्नही गाजणार आहेत बंद पडलेले कचरा विलगीकरण केंद्र, शहर हद्दवाढ, कासार तलावाचे अपूर्ण सुशोभीकरण, बाजारतळाचा विकास, उच्चदाबाने होणारा विद्युत पुरवठा, बस स्थानकाची दुरवस्था आणि धारूर किल्ल्याच्या संवर्धनाचे प्रलंबित काम. हे विषयही मतदारांच्या मनात तितकेच महत्वाचे असले तरी, घराघरातली सर्वात तीव्र गरज 'पाणी' असल्याने मुख्य लढत याच मुद्द्यावर केंद्रित राहील, हे निर्विवाद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande